Zenda Marathi Ringtone

Download Here

Zenda Marathi Ringtone Download Here.

Song Lyrics:

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो
साचले मोहाचे धुके घनदाट हो
जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो
साचले मोहाचे धुके घनदाट हो

आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती

आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्याचा देव होता
भलताच त्याचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता
दगडात माझा जीव होता…

उजळावा दिवा म्हणूनिया किती
मुक्या बिचार्‍या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती

बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं उभ्या उभ्या संपून जाई…
उभ्या उभ्या संपून जाई
उभ्या उभ्या संपून जाई

अळ रीत रीत माझं बघुनी उमगलं
कुंपण इथ शेत खायी
कुंपण इथ शेत खायी

भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती तरी
झेंडे एगळे, वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती

Leave a Reply

Your email address will not be published.